मुक्ताईनगर भाजपतर्फे तहसीलदार यांना निवेदन
मुक्ताईनगर (सचिन झनके) मुक्ताईनगर भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा तर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे व 3 मार्च पर्यंत कोठडी दिली आहे. त्यांचा लवकरात लवकर मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा नाहीतर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भर तीव्र निदर्शने व आंदोलन करेल अशी मागणी भाजपा मुक्ताईनगर तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपस्थित डी एस चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रेखाताई पाटील, भाजपा तालकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, जिल्हा उपाध्यक्ष नीता गाजरे, महिला जिल्हा सरचिटणीस जयश्री पाटील, नजमा ताई तडवी, ता.सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, भाजपा युमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, रावेर तालुका अध्यक्ष रेखाताई बोंडे, फैजपूर शहराध्यक्षा जयश्री चौधरी, कृष्णा पाटील, गणेश गावले, तुषार राणे, पंकज भारंबे आदी सहित कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.