अमळनेर

आगळा -वेगळा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला योगेश पाटील यांनी वाढदिवस

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ओम स्वामी ठिबक कंपनी चा सातवा वर्धापन दिवस व योगेश पाटील यांचा वाढदिवस हा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाने आणि विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. गो-पालन कर्ते त्रिकोणी बाग जवळील कुसुमताई, आशाताई, चारुताई यांना चाऱ्यासाठी आर्थिक मदत दिली तर मुक्या प्राण्यांची सेवा करणारे नांदु यांचा सन्मान करून आर्थिक भेट दिली.

युवा उद्योजक योगेश पाटील यांनी सुरू केलेली ओम स्वामी ठिबक कंपनी ही नवीन युवक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे ग्रामीण भागातील युवकांनी योगेश पाटलांचा आदर्श घेऊन उद्योजक होणे योग्य राहील असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमास उपस्थित पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख मान्यवर सुभाष अण्णा चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी बोलतांना केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमाताई पाटील, अर्बन बँकेचे संचालक लालचंद सैनानी, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डी वाय एस पी राकेश जाधव साहेब, ओमस्वामी ठिबक कंपनी चे प्रेरणा स्थान पोस्टमास्टर बी एस पाटील ,खादी ग्रामोद्योगचे एन के पाटील, ना. तहसीलदार एस एम पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम एच पाटील, विठ्ठल पाटील, गुणवंत पवार, नगरसेवक मनोज पाटील, अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन प्रविण पाटील, योगेश बाग, सेवानिवृत्त सैनिक पंकज पाटील, हभप उमेश महाराज, वसुंधरा लांडगे, प्रा.आर व्ही पाटील, पीएसआय मोरे, ना.तहसिलदार ए.टि.पाटिल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप पाटिल महेंद्र पाटील विमा प्रतिनिधी, रवी, विकी पाटील, कंपनीचे वर्कर विशाल पाटिल, अप्पा पाटिल, दत्तू पाटिल, हेमांशु पाटिल, फोटो ग्राफ़र शुशील भोईटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून उद्योजक योगेश पाटील यांनी प्राणी दया या उद्देशाने मुक्या प्राण्यांची सेवा करणारे नंदू पाटील यांच्या गोसेवेच्या उपक्रमाला आर्थिक मदतीचा धनादेश देऊन सत्कार केला. कुसुम, आशा व चारु यांना गो मातेच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत दिली. सुत्रसंचालन जगतगुरु गुरुवर्य बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील यांनी केले तर आभार योगेश यांनी मानलेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे