श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील क्रांती पाटील यांचे करिअर कटटा उपक्रमात जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून निवड
चोपडा (विश्वास वाडे) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय फार्माकॉग्नॉसी विभागातील प्रा. क्रांती देवेंद्र पाटील यांचे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कटटा उपक्रमात जळगाव जिल्हा समन्वयक (तंत्रज्ञान विभाग) म्हणून नेमणूक करण्यात आली.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्य सुरू असलेल्या IAS आपल्या भेटीला वा उद्योजग आपल्या भेटीला हा खूप चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. या निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळचे अध्यक्ष भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी.वडनेरे, प्रबंधक प्रफूल्ल बी मोरे, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.