करमाळा येथे शेर ए हिंद सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
करमाळा (प्रतिनिधी) शेर ए हिंद सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन मोहल्ला गल्ली येथे सपन्न झाले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करमाळा मोहल्ला गल्ली येथे शेर ए हिंद सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन मनौद्दीन शेख हाजी फारुख बेग व जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांच्या हस्ते सपन्न झाले.
याप्रसगी शेर ए हिंद संस्था अध्यक्ष मनौद्दीन शेख यांनी बोलताना सागितले की, समाजातील युवकांना जयकुमार कांबळे यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे या उपक्रमामुळे समाजातील युवकांना चांगला लाभ होईल असे सागितले. तर संघटना मार्गदर्शक हाजी फारुख बेग म्हणाले की, सदरील वाचनालय मोठ्या पुस्तक रुपी वाचनालयात रुपातर व्हावे आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर जयकुमार कांबळे म्हणाले की, समाजातील कोणत्याही घटकासाठी माझ्याकडून जे साहाय्य करता येईल ते करणार आहे असे अभिवचन कांबळे यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कांग्रेसचे उपाध्यक्ष आश्पाक जमादार, समीर शेख ,आलीम खान, समीन शेख, आरिफ खान, शहीद बेग, सोहिल शेख, आलीम बेग, आयान बेग, फुजेब शेख, साहिल शेख, जुनेद शेख, संदीपान धाखतोडे, राहुल कांबळे, रविंद्र कांबळे, दयासागर जानराव, यश कांबळे आदी युवक वर्ग उपस्थित होता.