महाराष्ट्र
दाभा ग्रामपंचायत येथे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बाभूळगाव : तालुक्यातील दाभा ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच वंदना दोडंगे, प्रमुख पाहुणे डॉ.भगवान काठोटे, आकाश मुलंडे, उपसरपंच राजीव लोखंडे तसेचं ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा वेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कावळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानामधील प्रास्ताविका संदर्भात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वतंत्र समता, बंधुता या मुद्यावर विस्तृतपणे माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेलं ५०% महिला आरक्षण व जातनिहाय आरक्षण याबद्दल अधिक माहिती दिली.