भाजप केंद्रीय एजन्सीचा वापर करून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करताय ; अब्दुल सत्तार यांची टीका
कन्नड : भाजप केंद्रीय एजन्सीचा वापर करून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असून तपास एजन्सी फक्त विरोधी पक्षातील लोकांवरील कारवाईसाठी काम करत आहे. केंद्रातील भाजप सरकार उद्योगपतींचे सरकार असून या सरकारने नोटाबंदीसारख्या विनाशकारी निर्णयाद्वारे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली अशी टीका महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड येथील सभेत केली.
भाजपच्या ढोंगी नेतृत्वाचा पर्दाफाश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन करतांना भाजपवर सडकून टीका केली. मुँह में राम और बगल में छुरी ही भाजपची नीती असून भाजपने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असे आमदार दानवे म्हणाले.
यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख केतन काजे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, अवचित नाना वळवळे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, डॉ. अण्णा शिंदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, शहरप्रमुख सुनील पवार, सदाशिव पाटील, गीताराम पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक गोकूळसिंग राजपूत, जि.प. सदस्य धनराज बेडवाल, अशोक डापके, राहुल वळवळे, शिवसेना महिला आघाडीच्या रुपाली मोहिते, हर्षली मुठ्ठे, उज्वला बिरारीज आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कन्नड व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.