उत्तम आबांची उत्तम कामगिरी ; सांगलीत व्यसनमुक्तीसाठी मद्य, अमली पदार्थांची अनोखी होळी साजरी
पातुर (सुखलाल उपर्वट) सांगलीतील भीमनगर या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव (आबा) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली होळी साजरी केली. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आज सांगलीमध्ये मद्य, अमली पदार्थांची होळी करून पेटवण्यात आले.
यावेळी भागातील नागरिकांनी या अनोख्या होळीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. होळी अनोख्या पद्धतीने साजरी केल्याने तरुणांनी अशा या व्यसनापासून आम्ही मुक्त होतं अशी शपथ घेतली. यावेळी लहान चिमुकल्यांनी डिमडी वाजून या अनोख्या होळीत सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव (आबा) कांबळे,माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे, मनीषा कांबळे, महादेवी सुतार, सखुबाई सूर्यवंशी, रेखा कांबळे, नाथा घाडगे, संकेत कांबळे यांच्यासह या भागातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.