ग्राहकांचे संघटन आणि सजग विद्यार्थी ग्राहक चळवळ देशाला विश्ववंदिता करील
असा आशावाद ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड यांनी दोन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी केला.जैन हिल्सच्या गांधी तीर्थ मधील कस्तुरबा सभागृहात अधिवेशन संपन्न झाले.

जळगांव(प्रतिनिधी) ग्राहकांचे संघटन आणि सजग विद्यार्थी ग्राहक चळवळ देशाला विश्ववंदिता करील
असा आशावाद ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड यांनी दोन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी केला.जैन हिल्सच्या गांधी तीर्थ मधील कस्तुरबा सभागृहात अधिवेशन संपन्न झाले.
पहाटे बहुतांश साधकांनी ‘ पीस वाॅक ‘केला.तसेच गांधी तीर्थ दर्शन केले. सर्व विभागांचे व सर्व जिल्ह्यांचे अहवाल सादर करण्यात आले.विदर्भ प्रांताध्यक्ष शामकांत पाञीकर यांनी ग्राहक चळवळ-समस्या,निवारण,प्रशासकिय निवेदन पद्धती,कर्तव्य आणि जबाबदारी,तदनंतर श्रीमती विजेता सिंह यांनी नविन,सुधारीत ग्राहक संरक्षण कायदा-2019,राज्यसचिव अरुण वाघमारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,कोकण विभागाध्यक्ष प्रा डाॅ सुरेश पाटील यांनी सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन,तर डाॅ प्रसन्नकुमार रेदासनी (जळगांव)यांनी रेड क्राॅस ब्लड बॅक व डाॅ गजानन पाटील(जळगांव)यांनी लॅप्रोस्कोपिक सर्जरी यावर मार्गदर्शन केले.2 दिवसात एकुण 11 अभ्यासपुर्ण,माहितीयुक्त सञे झालीत.महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातुन 300 साधक उपस्थित होते
सन्मान सोहळ्यात संस्थेचे सदस्य असलेले, जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे नवनिर्वाचित अशासकिय सदस्य म्हणुन निवड झालेले संजय बाळकृष्ण शुक्ल(भुसावळ),उदयकुमार शरदचंद्र अग्निहोञी(चोपडा),महेश भगवानदास चावला,डाॅ अविनाश सोनगीरकर,सौ अंतिम देवेंद्र पाटणी,अॅड मंजुळा कचरुलाल मुंदडा,सर्व-जळगांव,सौ सुषमा सुभाष चव्हाण(पहुरपेठ,जामनेर)यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. तसेच विभाग निहाय स्व अरुण भार्गवे स्मृती प्रित्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार नाशिक विभागा तर्फे महेश चावला,जळगाव व कोकण विभाग तर्फे संदेश तात्या तुळसणकर(वैभववाडी), मराठवाडा छ. संभाजीनगर विभाग तर्फे सचिन कवडे तर विदर्भ प्रांत तर्फे शोभा सोनकनवरे यांना स्मृतीचिन्ह,मानपञ,शाल देउन सन्मानित करण्यात आले.तसेच संयोजक जळगांव जिल्हा टिम व नाशिक विभाग टिमचा सत्कार सोहळा संपन्न झाला.नाशिक विभागाध्यक्ष डाॅ अजय सोनवणे,विभाग संघटक संजय शुक्ला,विभाग सचिव प्रा डाॅ ए बी महाजन, विभाग सहसंघटक अॅड सुरेंद्र सोनवणे,विभाग सहसचिव श्रीकांत पाठक, जळगांव जिल्हाध्यक्ष मनोज जैन,जिल्हासंघटक सतिष गढे,जिल्हासचिव उदय अग्निहोञी, जळगांव तालुकाध्यक्ष महेश चावला, व CN डिजीटेकचे संचालक नविन व निरज चावला,अस्धिरोगतज्ञ डाॅ नितिन धांडे,गुरुबक्ष जाधवानी,डाॅ अविनाश सोनगीरकर,मिलिंद मांडळकर,कुरकुरे,जोशी,चि अर्थव शुक्ल आणि नाशिक टीम अॅड समीर शिंदे,प्रशांत देशमुख,परदेशी, श्री रमेश मगरे,अशोक सुर्यवंशी .आदींनी उत्तम संयोजक,सुक्ष्म नियोजन केले होते.दोन दिवसीय राज्य अधिवेशनाचे CN डिजीटेक तर्फे फेसबुक-Live व यु-ट्युब द्वारे ही प्रसारण करण्यात आले. सुञसंचालन ए.बी. महाजन यांनी तर पसायदान सौ. मेधा कुळकर्णी यांनी गाऊन राज्य अधिवेशनाची सांगता झाली.