जेष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
धुळे (प्रतिनिधी) जेष्ठ नगरसेविका प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांना नुकताच नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रा श्री सागर चौधरी सर यांची कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या धुळे महानगर सचिव पदी निवड झाली आहे. यामुळे प्रा सागर चौधरी यांच्या निवासस्थानी डॉ आ सुधीरजी तांबे साहेब यांनी भेट देऊन सत्कार व अभिनंदन केले. यावेळी सर्व कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांचेही सत्कार व अभिनंदन करण्यात आले
यावेळी उपस्थित प्रदीप भदाणे अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना धुळे महानगर, तसेच सचिन भदाणे सर माजी अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस धुळे, प्रा अतुल पाटील, सदस्य जिल्हा कार्यकारणी धुळे, संजय पवार अध्यक्ष, टीडीएफ संघटना धुळे, देवानंद ठाकूर अध्यक्ष, शिक्षकेत्तर संघटना धुळे, प्रा मनोज बुवा जिल्हा कार्यकारणी सदस्य धुळे, प्रा चंद्रशेखर तोरवणे सदस्य, जिल्हा कार्यकारणी धुळे, प्रा भागवत पाटील सदस्य, जिल्हा कार्यकारणी धुळे, प्रा जयप्रकाश शहा सहसचिव, धुळे महानगर, अमीन उर्दू संघटना धुळे, प्रा नितिन पाटील, वैभव सयाजी, लखन नेरकर, सागर पाटील, हेमकांत अहिरराव डायट धुळे,प्रा प्रणव पाटील डायट धुळे, धनंजय पाटील स्केटिंग कोच धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.