निवेदनाची विद्युत विभागाने घेतली दक्षता ; शेतकऱ्यांना मिळाला न्याय
अमरावती (महेंद्रसिंग पवार) धारणी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी धारणी तालुक्यातील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता ७० कृषी पंपाची डी.पी. खंडीत केल्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाली होती. सदर मागणी साठी माजी आमदार प्रभूदासजी भिलावेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालालजी मावस्कर यांचे नेतृत्वात माजी उपसभापति रामगोपालजी मावस्कर, माजी सरपंच रविंद्र जावरकर, माजी सरपंच नागुलाल धांडे व शेतकर्यांचे उपस्थितीत विद्युत वितरण कार्यालय धारणी येथे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तेव्हा विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकार्याशी चर्चा करुन कृषी पंपाची थकीत रक्कम पैकी चालू बिल २३/०१/२०२२ पर्यंत भरण्याची अटीवर तत्काळ विज बिल खंडीत केल्यापासुन १२ तासाचे आत वीज सुरू करुन घेण्यास यश प्राप्त करुन घेतले आहे. तसेच विद्युत विभागाची ही कार्यवाही अन्यायकारक असून खेदजनक आहे. मेळघाटाच्या इतिहासात आतापर्यंत अशा प्रकारची कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे सदर खंडीत केलेली विद्युत पुरवठा १२ तासाच्या आत सुरू न केल्यास आमरण उपोषण सारखे, जंन आदोलन लोकशाही मार्गाने करण्याचा निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर विद्युत विभागाने दक्षता घेवून शेतकर्यांना न्याय मिळालेला आहे.