बोदवड पंचायत समिती चार गणाचे आरक्षण जाहीर .
दिनांक-३१ जुलै २०२२
प्रतिनिधि-सतीश बाबस्कर.
तहसील कार्यालयात २९ जुलै रोजी ११ वाजता उपजिल्हाधिकारी रोजगार हमी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये पंचायत समितीचे चार गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे यात सालशिंगि नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला शेलवड सर्व साधारण , नाडगाव अनुसूचित जाती महिला,मनुर बुद्रूक सर्व साधारण अशा चार गणाचेआरक्षण सोडत करण्यात आली यावेळी , प्रशांत कुलकर्णी,सहाय्यक पुरवठा अधिकारी जळगांव दिपाली ढोले,निवडणूक शाखा नायब तहसीलदार संध्या सुर्यवंशी व गटविकास अधिकारी हेमंत कुमार काथेपुरी यानी सहकार्य केले यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील महिला आघाडी अध्यक्ष वंदना पाटील काँग्रेस पक्षाचे भारत पाटील सागर पाटील शिवसेनेचे दिपक माळी समाधान बोदडे भाजपचे प्रभाकर पाटील यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.