महाराष्ट्र
मालपुर गावात चोरीचे सत्र सुरू ; घरफोडी करून रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास
मालपुर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे. येथील आंबेडकर चौकातील एका घरातून रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे कि, आंबेडकर चौकात भाडेकरू म्हणून राहणारे अविनाश पंडित सोनवणे सदर यांच्या घरात रात्री २ वाजता चोरी झाली. अज्ञात चोरट्याने रोख रक्कम १० हजार रुपये व सोने चांदीचे दागिने लंपास केले.
दरम्यान, या घटनेनंतर पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्यांचे मागणी मालपुर करांनी केली आहे. तरी ग्रामिण भागात जर लक्ष दिले तर चोरांना नक्कीच चाप बसेल.
तसेच खाकीच्या धाक दिल्याशिवाय ग्रामीण भागात चोरी सत्र थांबणार नाहीत म्हणुन पोलीसांनी लक्ष देण्यात यावी अशी मागणी मालपुर ग्रामस्थांनी केली आहे.