वैजापूर तहसीलदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे प्रकाश डोखे यांना दिले चर्चा चे संकेत
वैजापूर : वैजापूर तहसीलदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे प्रकाश डोखे यांना चर्चा चे संकेत दिले असून प्रकाश डोखे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
गोदावरी पूर घोटाळा प्रकरण डोणगाव मध्ये रक्कम 14 लाख 63 हजार 745 चा अपहार शासकीय तिजोरीतील अपहार होत असताना पुरावे असून सुद्धा कार्यवाही होत नाही. तसेच डोणगाव गावठाण बागायत शेती करीत असताना गोरख शिवनाथ डोखे गटनंबर 166 चे असतानाही कार्यवाही होत नाही. करिता मी प्रकाश डोखे अमरण उपोषण व प्रसंगी जलसमाधी 14 एप्रिल 2022 रोजी घेणार होतो पण तहसीलदार राहुल गायकवाड यांनी मला माझा स्वतःचा भ्रमणध्वनी वर फोन करून सदर प्रकरणाबाबत तातडीने आपणास नोटिशी द्वारे बोलावून घेऊन चर्चा करणार आहे. त्यादिवशी आपण हजर राहावे असे तहसीलदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळविले आहे. तरी आपण उपोषणाचा मार्ग अवलंबून नये व उपोषण मागे घ्यावे असे सांगितले. म्हणून मी प्रकाश डोखे त्यांच्याकडून म्हणजे शासकीय कर्मचारी मंडळ अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेत असून माझे उपोषण मागे घेत आहे.