भाजपाच्या उमेदवार ॲड. पुनम जगदीश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन
साक्री (सतीश पेंढारकर) नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात रंग चढू लागला आहे. काल दिनांक १६ रोजी प्रभाग क्रमांक एक मधील भाजपाच्या उमेदवार ॲड. पुनम जगदीश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण प्रभागात भाजपामुळे वातावरण झाल्याचे अनुभवास येत होते. याप्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार रॅलीचा प्रारंभ महादेव मंदिरात प्रभागातील ज्येष्ठ मतदारांचा हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रभारी अनुप अग्रवाल, चंद्रजीत सुरेश पाटील, हर्षवर्धन दहिते, धुळ्याचे उपमहापौर भगवान गवळी, ॲड गजेंद्र भोसले, जि.प.सदस्य विजय ठाकरे, रमेश सरक, उत्पल नांद्रे, विजय भोसले, वेडू सोनवणे, महेश अहिरराव, शैलेंद्र आजगे, शिवाजी देवरे, नैनेश भांमरे, आबासाहेब सोनवणे, योगेश भामरे, राकेश दहिते, धनराज चौधरी, कल्याण भोसले, शिवराम पाटील, सुभाष अहिरराव, संदीप बेडसे, मधुकर तोरवणे, प्रकाश आहिरे, वैभव सोनवणे, रंजना अहिरराव, आशाबाई सूर्यवंशी, माया पाटील, स्मिता बच्छाव, रोहिणी अकलाडे, आदींसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभागातील मतदारांना ॲड पुनम शिंदे यांनी मागील पाच वर्षात प्रभाग क्रमांक ३ मध्ये केलेल्या विकास कामांची तसेच मागील दोन वर्षापासून प्रभाग १ मध्ये सुरू असलेल्या कामाची आठवण करून देत भाजपा उमेदवार पुनम शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. उच्चशिक्षित आणि कर्तव्यदक्ष उमेदवार असलेल्या शिंदे यांना प्रभागातील मतदारांचा निर्विवाद पाठिंबा असून सन शिंदे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून केवळ प्रभागातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आपली ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
कोणावर टीकाटिपणी करत बसण्यापेक्षा आपण सुशिक्षित आहोत जाणकार आहोत या गोष्टीचा लाभ प्रभागातील रहिवाशांना जास्तीत जास्त पद्धतीने कसा मिळवून देता येईल. या बाबीवर आपण काम करीत असून मागील सहा सात वर्षाच्या काळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणुकीसाठी केलेला प्रयत्न हाच आपल्या प्रचाराचा मुद्दा असल्याचे उमेदवार पुनम शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले आहे.