माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना शिवसेना, युवासेनेच्या वतीने अभिवादन
सिल्लोड (विवेक महाजन) माँसाहेब स्व. मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील डीग्रस येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. येथील मारुती मंदिर सामाजिक सभागृहात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्त शेख सलीम, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, शिवना चे उपसरपंच गणेश सपकाळ, सुधाकर काळे, प्रवीण मिरकर, पानवडोद चे उपसरपंच प्रमोद दौड, वांगी चे सरपंच बापूराव काकडे, अकिल देशमुख, गोळेगाव चे राजुमिया देशमुख, भास्कर बनकर, सय्यद कैसर, डीग्रस गावचे सरपंच कैलास तायडे, गंजीधर गौर, कैलास बेलेकर, खालेक चाऊस, राजू शहा, रमेश नरवडे, स्वप्नील शेळके आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.
सिल्लोड येथील सेना भवन येथे ही घेण्यात आला अभिवादन कार्यक्रम
माँसाहेब स्व. मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिल्लोड शहरातील महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, मेघा शाह, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धाडगे, रवी गायकवाड, रवी रासने, सचिन पाखरे, फहिम पठाण, जगन्नाथ कुदळ आदी शिवसेना- युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.