तळोदा येथे जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल महाराजांच्या सत्संगाचे आयोजन
एक रुपयाही न खर्च करता अनोखा रमणी विवाह सोहळा संपन्न
तळोदा (दिपक गोसावी) आज रोजी तळोदा येथील मिरा कॉलनीत संत रामपाल महाराजांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व रामपाल महाराजांच्या अनुयायी यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शविली.
संत रामपाल महाराज हे जगात सर्व धर्मीयायिंना सोबत घेऊन समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहेत. त्यामध्ये व्यसनमुक्ती तसेच विना हुंडा लग्न सर्व समाजात प्रेमाचा संदेश देण्याचे महान कार्य त्यांच्याकडून होत आहे.ते आपल्या तत्वज्ञानातून तिन्ही देवतांचे माता पिता कोण, सृष्टीची रचना कशी झाली,आपण मृत्यू लोकात कसे आलोत, आपण दुःखी का आहोत आपला जन्म आणि मृत्यू का होतो,खरा परमात्मा कोण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते आपल्या चार वेद, अठरा पुराण ,सहा शास्त्र आणि गीतेच्या माध्यमातून सर्व पुराव्यानिशी सांगतात तेव्हा सर्व स्तरातून हे स्पष्ट होते की खरा परमात्मा कोण आहे.
याठिकाणी आज रोजी सत्संगामध्ये रमणी विवाहाचे आयोजनही करण्यात आले. त्यात भगतजी सुखलाल. रा.कार्ली ता.जिल्हा नंदूरबार यांचा विवाह भगतमती यशोधा.रा. व्याहुर ता.जिल्हा नंदूरबार यांच्या सोबत अवघ्या १७ मिनिटात विना हुंडा ,विना खर्च हा विवाह सोहळा पार पडला या ठिकाणी सर्व वर्हाडी म्हणून संत रामपाल महाराजांचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते. असे अनेक विवाह या पूर्वी ही झाले आहेत.या ठिकाणी कुठल्याही धर्माची बाधा आड येत नाही सर्व धर्माचे अनुयायी याठिकाणी पहावयास मिळतात. हा अनोखा सत्संग तसेच विवाह सोहळा यशस्वीतेसाठी सर्व भगतजी व भगतमती यांनी परिश्रम घेतले.