ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे अंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे दिनांक २१ जून २०२२ रोजी सकाळी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ऑर्डनंन्स फॅक्टरी भुसावळ चे (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार व दीपशिखा महिला कल्याण समिती उपाध्यक्ष सुदिप्ता सरकार यांच्या हस्ते सकाळी ६:००वा. ॐ च्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी सुरक्षा अधिकारी सुशीलकुमार व बी देवीचंद डीजीएम आणि महिला कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी महिलांनी ॐ च्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले यावेळी कार्यक्रमाला सर्व अधिकारी सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जेसीएम थ्री. जेसीएम फोर्थ मेंबर कार्यसमिति सदस्य व डीएससी चे जवान सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. यावेळी योग प्रशिक्षक एम. एस. राऊत यांनी सर्वांना योगसाधने चे धडे दिले. आपल्या भाषणात (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार म्हणाले कि,”आज जसे मोठ्या संख्येने व उत्साहात योगाभ्यास केला तसा प्रत्येक दिवशी योगाअभ्यास करून प्रत्येकाने आपले शरीर निरोगी व निरामय आयुष्य जगावे योग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, म्हणून रोज योग करणे आवश्यक आहे.” अशी माहिती ऑर्डनंन्सफैक्ट्री भुसावळचे (पीआरओ) बी. देवीचंद (डीजीएम) यांनी स्पीड न्यूज महाराष्ट्र यांच्याशी संवाद साधतांना दिली.