महाराष्ट्र
सेना भवन येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
सोयगाव (विवेक महाजन) शहरातील महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे, माजी शहरप्रमुख गजानन चौधरी, कृष्णा राऊत, मोतीराम पंडीत, रमेश गव्हांडे, अक्षय काळे, अमोल मापारी, राजू दुतोंडे, लतीफ शाह, मंगेश सोहनी, शेख रऊफ, संदीप चौधरी, दिनेश काळे, दिपक पगारे, भगवान वारंगणे, राजू कुडके, गजानन कुडके, भगवान जोहरे, राहुल श्रीखंडे, विनोद सोहनी, दिपक चनाल, हर्षल काळे, शाम एंडोले, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.