धुळे महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी शितलभाऊ नवले यांची बिनविरोध निवड झाल्याने स्वराज्य जिम मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार !
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील मिल परिसरातील कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित आणि अभ्यासु नगरसेवक असलेले शितलभाऊ नवले यांची धुळे महानगरपालिका धुळेच्या स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याने स्वराज्य जिम मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत आज सत्कार त्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला.
शितलभाऊ नवले यांनी मिल परिसरात युवकांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत आणि राबवीत आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्वराज्य जिम होय. मिल परिसर म्हणजे सर्व सामान्य कष्टकरी व्यक्तींचा परिसर म्हणून ओळखला जातो. याच परिसरात असलेल्या शीतल भाऊ नवले यांच्या स्वराज्य जिम मध्ये सकाळ सत्रात आणि सायंकाळच्या सत्रात शेकडो युवक व्यायाम करत असून याकरिता त्यांच्याकडून कुठलीही फी आकारली जात नाही. शितलभाऊ नवले यांनी सदरची जिम व्यायाम करण्याऱ्या युवकांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.
यात सकाळच्या सत्रात स्वराज्य जिम मध्ये व्यायाम करणाऱ्या युवकांनी स्वराज्य जिम मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती शितलभाऊ नवले यांची धुळे महानगरपालिका धुळेच्या त्यांच्या स्थायी समिती सभापती दालनात भेट घेत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला.
यावेळी शितल भाऊ नवले यांनी सर्वांचे आभार मानले. या सत्कार प्रसंगी निलेश काटे, सिद्धार्ध जगदेव, चंद्रकांत ओगले, भूषण ढवळे, बंटी कढरे, मधुकर फेटे, डॉ. कैलास सोनावणे, जगदीश झिरे, बाळा कदम, विनोद मांडरे, अक्षय माखीजा, मार्शल लाडे, उमेश जगदाळे, सिद्धांत बागुल आदी स्वराज्य जिम मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व व्यायाम प्रेमी उपस्थित होते.