एनसीसीच्या माजी छात्रसैनिक मेळाव्यात आठवणींना उजाळा
धुळे (विक्की आहिरे) शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयात ४८ महाराष्ट्र बटालियनच्या माजी छात्रसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरासह तालुक्यातील विभिन्न महाविद्यालयांतील ४८ महाराष्ट्र बटालीयनचे माजी छात्रसैनिक उपस्थित होते. या वेळी छात्रसैनिकांनी आठवणींना उजाळा दिला.
४८ महाराष्ट्र बटालयीनच्या वतीने एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात माजी छात्रसैनिकांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मनोहर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ एम व्ही पाटील, ४८ महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल पराग कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी कॅप्टन महेंद्रकुमार वाढे यांनी एन. सी. सी. च्या माजी छात्र सैनिकांची संघटनेची भूमिका मांडली.
यावेळी माजी छात्रसैनिक दिनकर पाटील, जुबेर शेख, संदीप पाटील यांनी माजी छात्र सैनिकांची भूमिका बाबत मनोगत व्यक्त केले. या वेळी चाळीस वर्ष पूर्वीचे माजी छात्र सैनिक देखील सहभागी झाले होते.