अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आझाद मैदानावर धडक मोर्चा
'ऑफ्रोह'च्या घोषणांनी आझाद मैदान दणाणले!
मालपुर (गोपाल कोळी) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली इथेच अधिसंख्य पदाची अर्धी लढाई आपण जिंकलो असा विश्वास व्यक्त करत अधिसंख्य पदाबाबत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी यामुळे सरकारवर दबाव निर्माण होईल असे प्रतिपादन ऑर्गानायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी केले. ते आझाद मैदानावरील ‘ऑफ्रोह’च्या धडक मोर्च्याला संबोधीत करत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, राज्य उपाध्यक्ष देवराम नंदनवार, सहसचिव डॉ. अनंत पाटील, मार्गदर्शक डाॅ.दिपक केदारे, राज्य सदस्य चंद्रभान सोनुने,नरेश खापरे, दत्तात्रय अन्नमवाड, ओमप्रकाश कोटरवार, मनीष पंचगाम, लिलाधर ठाकूर, महादेव बेदरे, महिला आघाडीच्या राजाध्यक्षा अनघा वैद्य, कार्याध्यक्ष रूख्मिणी धनी, उपाध्यक्ष प्रिया रामटेककर, माधुरी मेनकार, सचिव नीता सोमवंशी , सहसचिव वंदना नंदनवार, पुष्पा किटाळीकर, स्मिता भोईर, कलावती डोमकुंडवार, अमरावती विभाग प्रमुख प्रा. सुरेश पाटकर, पुणे विभाग प्रमुख भारती धुमाळ, ठाणे ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी , रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे यांच्यासह ‘ऑफ्रोह’चे पदाधिकारी उपस्थित होते. जयेश अनंत तरे, गीतांजली कोळी, सिद्धेश्वर कोळी हेमंत सूर्यवंशी इ. सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्च्यास मार्गदर्शन केले.
धुळे येथील आदिवासी टोकरे कोळी वाल्या सेना संघटनेच्या मार्गदर्शक गीतांजली कोळी यांनी आंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या अन्यायाविरुद्ध एकजूट झालेल्या सर्व 33 अन्यायग्रस्त जमातीचे आंदोलनासाठी कौतुक करत आपल्या हक्क आपण मिळवणारच अशी गर्जना करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऑफ्रोह च्या मोर्चा प्रसंगी दुपारी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ऑफ्रोह च्या २,२ प्रतिनिधीला बोलाविण्यात आले. ऑफ्रोहचे जेष्ठ मार्गदर्शक वित्त विभाग चे निवृत्त सहसंचालक डॉ दीपक केदार, राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम यांनी सचिव सुमंत भांगे यांच्यासोबत आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते व नरेश खापरे यांनी चर्चा केली.