दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेवर प्रशासक बसणार
घाईगडबडीत विविध विकास कामे उद्घाटनाचा धडाका, केंद्रीय रक्षामंत्री येण्याची दाट शक्यता
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथील दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीला २० डिसेंबर २०२१ रोजी पाच वर्षे पुर्ण होत आहे. म्हणून ह्या दिवशी सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष- सभापती-नगरसेवकांचे सर्व अधिकार संपुष्टात येत, नगरपालिकेत प्रशासक बसण्याची दाट शक्यता आहे. ह्या पाश्वभुमीवर २० तारखेच्या आत गावात सत्ताधारी गटाकडून विविध कामाचे घाईगडबडीत उद्घाटन केले जाण्याची शक्यता असुन उद्घाटनाला केंद्रीय रक्षामंत्री राजनाथसिंह यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती विशेष सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मागे सन २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात झाली होती व २० डिसेंबर रोजी नगरपालिकेत सर्वाधिक संख्येने निवडून आलेले भाजपा पुरूस्कुत रावल गटाचे २० नगरसेवक व जनतेतुन निवडून आलेल्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार यांनी पदभार स्विकारला. तर सोबत विरोधी पक्षातील तीन नगरसेवक व एक मनसेचे नगरसेवक निवडून आले होते.
मात्र मागील वर्षी देशात कोरोना आजाराची महामारी असल्यामुळे सर्वच राज्यांना अधीक प्रमाणात हानी पोहचली आहे. म्हणून आजही वर्षभरानंतर सरकार जनतेची काळजी घेत, विविध नियम पाळत जनतेला खबरदारी घ्यायचे सांगत आहे. त्यात आता पुन्हा भर ओमायक्रोन सारख्या दुसऱ्या आजारामुळे पडण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार पुन्हा जनतेची काळजी म्हणून विविध गाईड लाईन जिल्हाधिकारीमार्फत लागु करत, नागरिकांच्या कोवीळ-१९ च्या दोन्ही डोस लसीकरणाच्या सख्येवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य भरात आपला कार्यकाळ संपवणाऱ्या विविध नगरपालीकांचे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम दोन-तीन महिने पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणून डिसेंबर महिन्यात जवळपास ज्या-ज्या नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपेल, अशा सर्व नगरपालिकेंवर लवकरच प्रशासक बसविण्याचे राज्य सरकारचे फर्मान जाहीर होणार असल्याचे विशेष सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या सर्व पाश्वभुमीवर गावात मागील चार वर्षात लगातार कोणतेही कांमाचा धुमधडाका न लावता पाचव्या वर्षाच्या शेवटी शहरातील नागरिकांच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत. त्या पुर्ण न करता, फक्त न फक्त चौक सुशोभीकरण चमकवणाच्या माध्यमातून का असेना संधी साधत. २० डिसेंबर २०२१ ह्या तारखेच्या आत दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेतील सत्ताधारी गट काही जणांचे मन दुखवत घाईगडबडीत विविध कामांचे उद्घाटन घडवून आणण्याचा उद्देश गाठत, जनतेच्या मनावर विकास कामे व दिलेला शब्द हाच असतो, असे बिंबवत आहे. त्यामुळे दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेत प्रशासक बसण्याचा दोन दिवस अगोदर गावात चौफेर विविध कामे दिवसरात्र मेहनत घेऊन, दैनंदिन रोडावरची साफसफाई करून पुर्ण केली जात आहे. त्यासाठी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते गावात विविध कामांचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची दाट शक्यता राजकीय विशेष सुत्रांकडून सांगण्यात आली आहे.