नंदुरबार चौफुलीवरील, शिवाजी महाराज स्मारका शेजारील हातलाँरी व्यवसायिकांना तात्काळ न्याय द्यावा
भेळ-चहा-नास्ताची लाँऱ्या लावणाऱ्यांवर वीस-पंचवीस दिवसांपासुन उपासमारीची वेळ
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे शहरात विविध चौकात मागील वीस दिवसापुर्वी थोर-महात्मा-युग पुरूषांचे स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र ही स्मारके उभारतांना त्याठिकाणी अगोदर जी लहान-लहान व्यवसायिक आपले कुटुंब चालविण्यासाठी हातावर मेहनत करत,चहा-भेळ-नास्ताची लाँरी लावून उपजिविका भागवत होते.त्यांना स्थानिक नगरपालीका प्रशासनाने कायद्याचा नियम दाखवत क्षणात लाँरी हटवायचे फर्मान काढले.मात्र गोड बोलून काढलेल्या ह्या अनधिकृत लाँरीधारकांची आज कुटुंब चालविण्याची परिस्थिती हलाखीची झाली आहे. इतर स्मारकापेक्षा एक सर्वात संवेदनशील म्हणजे नंदुरबार चौफुलीवरील शिवाजी महाराज स्मारका शेजारील लहान-लहान व्यवसायिकांची मागील वीस ते पंचवीस दिवसांपासुन व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली असुन, अनेकवेळा नगरपालीका प्रशासनाकडे चक्कर मारून, पर्यायी स्मारकापासुन थोड लांब असलेल्या ठिकाणी ही प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली.
तरी प्रत्येकाचा कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. पण आज वीस-पंचवीस दिवस झाले तरी प्रशासनाकडून मार्ग निघत नसल्याने दु:खी-नाराज लाँरी धारकांनी जवळच असलेल्या आहिल्याबाई शाँपींगमधील इतर दुकानांच्या पुढे व आजुबाजच्या बोळीत लाँऱ्या उभे करणे चालू केले असल्यामुळे दुकानदार व लाँरी धारकांमध्ये रोज तु-तू में-मैं होत असुन, दोघाचांही रोष प्रशासनावर निघत आहे. म्हणुन नुकतेच नव्याने नगरपालीकेत बसलेले प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने यावर तोडगा शोधत,लाँरी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा सुर दु:खी-नाराज लाँरी धारकांमधुन निघत आहे.
आजमितीला नंदुरबार चौफुली शिवाजी महाराज स्मारका शेजारी अगोदर व्यवसाय करणारे विक्की सोनार(चहा हाँटेल), प्रफुल्ल रविंद्र भोई(शरबत-सोडा लाँरी), जितू गुप्ता(वडापाव नास्ता), सोनार मामा(नास्ता लाँरी),किरण पाटील(पानटपरी), बापू ठाकुर(कुशनकाम), विनय ठाकूर(सँडविच सेंटर),सत्तार गँरेजकाम, आकाश रामोळे(नास्ता सेंटर),अशोक न्हावी(सलून दुकान),,मुस्तकीन मन्यार(शाँकअप रिपेअर),विनोद चाभांर,जुबेर खाटीक, मौसीम पिंजारी, भुषण खरकार, जितेंद्र काळे आदी व इतर ज्यांची नावे माहीत नाही, असे विविध खाद्य पदार्थांची लाँरी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.मात्र मागील वीस-पंचवीस दिवसापुर्वी नगरपालिका प्रशासनाने गोडीगुलाबीने, कायद्यावर बोट करत यांना येथुन तात्पुरत्या आश्वासनावर म्हणजे स्मारकाचे काम पुर्ण होऊन उद्घाटन झाल्यापर्यंतच्या अटीवर इतरत्र हलवले होते. पण आज ह्या घटनेला वीस-पंचवीस दिवसांच्या वरती कालावधी झाला असुन, लाँरीधारक बेरोजगारीने वैतागून रोज नगरपालीकेत चकरा मारत आहे. मात्र दुकाने पुर्ववत जागेवर सुरु व्हायची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी जवळच असलेल्या राजपथ रस्त्यावर, आहिल्याबाई शाँपीग, गावात जाणारा डायव्हर्शन रस्ता, शासकीय विश्राम ग्रुहपुढे व शेजारील पटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाँऱ्या-टपऱ्या-मोठमोठी लोखंडी टप लावून राजपथ रस्त्यांची शानची घाण करून टाकली आहे. म्हणून यांचा त्रास नुसता येणार-जाणाऱ्यांना नाही तर ज्यांच्या दुकानांपुढे ह्या लाँऱ्या-टपऱ्या लावल्या आहेत. त्यांनाही यांचा त्रास होत आहे. म्हणून नगरपालीकेत नुकतेच नव्याने बसलेले प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने तोडगा शोधून यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायला हवी, असा सुर पल्स मागणी दोघी बाजुने दुखवत असलेल्या दुकानदांरामधुन निघत आहे.