दहिवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
साक्री (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवेल येथे महाराष्ट्र नवनिर्मान सेना साक्री तालुका च्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले. त्यावेळी ह.भ.प.दिनेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतिशय सुंदर व्याखान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दहिवेल गावातील माजी उपसरपंच अविनाश बच्छाव, प्रथम नागरिक उपसरपंच रूपेश बच्छाव हे होते तर प्रमुख पाहुणे मनसे राज्य उपाध्यक्ष व धुळे जिल्हा संघटक धिरज भैय्या देसले, दहिवेल ऑऊट पोस्ट चे पोलिस हे. काॅ.अशोक पाटील होते. कार्यक्रम प्रसंगी मनसे उपाध्यक्ष योगेश मोरे (जनहित), योगेश पाठक, एस.के.बापू , किरण, हेमंत बच्छाव, आकाश साळी, आकाश बच्छाव, किशोर बच्छाव, जयवंत बच्छाव, जगदिश बच्छाव, भिमराव बच्छाव, सजंय बच्छाव, जगदिश खैरणार, पंकज बच्छाव, दादू नांद्रे, सागर बच्छाव, भुषण माळी, जगदिश गुरव, नयन बच्छाव, जयेश बच्छाव, बाल गोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मनसे साक्री तालुका अध्यक्ष संदिप बच्छाव (बाबा पत्रकार) व विश्व हिन्दू परिषद च्या सदस्या कडून कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला दहिवेल येथील तरूण मडळी सह ग्रामस्थ उपस्थित होते.