अतिवृष्टी पावसामुळे नागरिक बेघर – आदिवासी सांस्कृतिक भवनामधे आसरा
तहसीलदाराकडून फक्त दिलासा - शासनाकडून काही एक मदत नाही.
दिनांक : १५ आँगस्ट २०२२
धारणी : प्रतिनिधि- सरकारी विहिरीजवळील वार्ड क्रमांक १,४,व ५ मधील सुमारे ३० ते ३५ घरातील नागरिकांचे मुसळधार पावसामुळे झालेली घराची हानि मुळे नागरिकांंना जगणे कठिण झाले आहे.जगण्यासाठी लागणारे अन्न वस्त्र व निवारा करिता कोणत्याही प्रकारच्या शासकीय निधी अजून मिळालेला नाही. तहसीलदार यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. अतिवृष्टी पावसामुळे तेथील मूूूळ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरले आहे अंदाजे तीन फूट उंचीपर्यंत पाणी शिरलेले आहे.त्यामुळे दिनांक १०आँगस्ट रोजी रात्री नागरिकांना रंग भवन आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हलविण्यात आले. येथे आल्यावर त्यांच्या साठी कोणती प्रकारची मदत नगरपंचायत धारणी यांच्याकडून मिळालेली नाही.
परिस्थितीची जाणीव घेत सामाजिक कार्यकर्ते ज्योती धांडे (बागडे) प्रशांत कैलास बागडे यांच्याकडून तेथील नागरिकांना महत्त्वाची मदत मिळाली. ज्योती धांडे बागडे यांनी सुरुवातीपासून तीन नागरिकांकरिता महत्त्वाची मदत केली त्यांना जेवणाची पाण्याची सर्व प्रकारची सुविधा त्यांनी करून दिली तसेच तुषार भाऊ चिखलकर राजूभाऊ पटोडकर यांच्या कडून पण सहयोग मिळाले.