शिंदखेडा तहसील कार्यालयात तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भुमिका घेत ई-पास मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा व निवेदन सादर
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुका स्वस्त धान्य व केरोसिन परवाना धारक संघटनेच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता तहसीलदार सुनील सैदाणे यांना संघटनेचे तालुका अध्यक्ष आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व रेशनधारकानी ई- पास मशीन जमा करून आंदोलनात्मक भुमिका घेऊन निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र मध्ये तसेच देशात आधार सर्व्हरला सतत येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे मागील तीन महिन्यांपासुन ई-पास मशीन द्वारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे. त्यामुळे 50 ते 75 टक्के वितरण झालेले नाहीत.ज्या दुकानाच्या मशीन वर धान्यपुरवठा उपलब्ध आहे त्या दुकानामध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेला नाही.यामुळे धान्य वितरण थांबलेले असुन शिधापत्रिका धारकांमध्ये रेशन दुकानदारा विरोधात रोष व असंतोष निर्माण झाला आहे.कटु अनुभव व प्रसंगी हल्ले झाले आहे.तसेच सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रणाली संदर्भात 18 मे 2018 च्या शासननिर्णयाची प्रभावी अंमलबजावणी प्रधान सचिव मार्फत वरीष्ठ पातळीवर संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधून त्यानुसार आज शिंदखेडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयात एकत्रित येऊन ई -पास मशीन जमा केले.तसेच नवीन प्रणाली चे मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.तोपर्यत धान्य वितरण संपूर्ण तालुक्यात होणार नाही असा पवित्रा यावेळी दुकानदारा नी घेतला असून आंदोलनात्मक भुमिका घेऊन ई पास मशीन जमा करून शांततेत तहसीलदार सुनील सैदाणे यांना पदाधिकारी नी निवेदन सादर केले.हयावेळी पुरवठा अधिकारी हर्षा दुधे अव्वल कारकून आर.व्ही.घोलप , सुभाष बाविस्कर उपस्थित होते.संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष आर. आर. पाटील , जिल्हा उपाध्यक्ष भाईदास तुळशीराम पाटील, तालुका सचिव सुरेश कुंभार ,उपाध्यक्ष तुषार पाटील , डिगंबर वाणी ,जलाल दादा .विजय भामरे यांसह तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार धारक सहभागी झाले होते