मुंबई येथे डॉ. संजयराव तायडे पाटील यांच्या उपस्थित वार्षिक अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन
दिवा (सचिन शेलवले) यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे डॉ. संजयराव तायडे पाटील (संस्थापक अध्यक्ष मेस्टा MESTA) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वर्षाताई गायकवाड (शिक्षण मंत्री), आदित्य उद्धव ठाकरे (पर्यटन मंत्री, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री), उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री), सचिन आहिर (इंटक कामगार मंत्री), ओम प्रकाश बच्चू कडू (शालेय शिक्षण राज्यमंत्री) हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. लढा हक्काचा वसा दर्जेदार शिक्षणाचा या माध्यमातून MESTA ही संस्था कार्य करत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू हे होते. गोर गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी MESTA ही संघटना अनेक तळागाळातील गावांच्यात जाऊन काम करते. या कार्यक्रमासाठी अनेक दूरवरचे संस्थाचालक तसेच शिक्षक सुद्धा आले होते. अनेक संस्था चालकांची भाषणे सुद्धा झाली. तसेच दळवी सर व सुदर्शना त्रिगुने यांनी MESTA संघटनेचे महत्त्व विशद केले.
ही संघटना इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संदर्भातील समस्या व येणारी आव्हाने तसेच आरटीआयच्या 25% यांचा हिशोब संदर्भातील मार्गातील प्रश्न शासन दरबारी लावण्यासाठी ही संस्था अनेक मार्गांनी तसेच छोटे-मोठ्या समस्या शासनदरबारी लावण्यासाठी MESTA ही संघटना सर्वत्र काम करत आहे. तसेच शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा या संस्थेचे सचिव साईनाथ लक्ष्मण म्हात्रे यांना तसेच JK पाटील इंग्लीश स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक गजानन पाटील यांचा कोरोना वारियर्स ॲवार्ड देऊन त्यांचा सत्कार या MESTA या संघटनेतर्फे करण्यात आला. अशा अनेक संस्थाचालकांचे कोरोना वारियर्स ॲवार्ड देऊन चांगली कामगिरी करणाऱ्या तसेच MESTA या संस्थेसाठी योगदान देणाऱ्या संस्थाचालकांचा आदरसत्कार प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.