अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेसह विविध पक्ष, संघटनासह समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सिल्लोड (विवेक महाजन) महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेसह विविध पक्ष, संघटना, तसेच समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने शहरातील शिवसेना भवन येथे ना. अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छाचा स्वीकार केला.
समर्थक व कार्यकर्त्यांची मोलाची साथ ,सहकार्या व प्रेमामुळेच आयुष्यात लढण्यासाठी ऊर्जा मिळते असे स्पष्ट करीत राजकारण करीत असतांना कार्यकर्ते व समर्थकांची भक्कम साथ लागते. वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्र जणांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिष्टचिंतनमूर्ती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्काराला उत्तर देताना केले. वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा व यानिमित्ताने मोफत सर्वरोग निदान शिबीर सारखे सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले.
दरवर्षी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी ओमायक्रोन – कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी विविध ठिकाणी आयोजित सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावर्षी चा मुख्य कार्यक्रम म्हणजे आज २ जानेवारी रविवार रोजी सिल्लोड येथील न. प. प्रशालेच्या मैदानात मोफत सर्वरोग निदान – उपचार, महालसीकरण व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्ससिंग चे पालन करून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा सोबतच राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले आहेत. त्याअनुषंगाने वैद्यकीय दृष्टया ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी आज २ जानेवारी रविवार रोजी सिल्लोड येथील आयोजित महारक्तदान शिबिरात अवश्य रक्तदान करा असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केले आहे.
यावेळी शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सूतगिरणी चे चेअरमन अब्दुल समीर, व्हाईस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, दीपाली भवर, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, औरंगाबाद जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख, सिल्लोड नगराध्यक्षा राजश्री निकम, खुलताबाद चे नगराध्यक्ष सय्यद कमरोधीन, भोकरदन चे नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गंगापूर माजी नगराध्यक्ष संजय जाधव, कन्नड शहराचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे, आदींसह जिल्हा मध्यवर्ती बँक , कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिग प्रेसिंग, नॅशनल सुत गिरणी, शिक्षक संघटना, वकील संघ, पत्रकार संघ आदी सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, विविध पक्ष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आज मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते होणार उदघाटन
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज (दि.२) रविवार रोजी शहरातील नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात मोफत भव्य सर्वरोग निदान, उपचार, रक्तदान व महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन पालकमंत्री ना.सुभाष देसाई यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. यासोबतच नवीन तहसील कार्यालय ईमारत बांधकामाचे भूमिपूजन तसेच उपजिल्हा रुग्णालय जवळ उभारण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटल (कोरोना केअर सेंटर) चे लोकार्पण पालकमंत्री यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोना नियमांच्या अनुषंगाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याने नागरिकांनी कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.