‘मन की बात’ हा कार्यक्रम घराघरात, प्रत्येकाने बघावा व ऐकावा : उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक बबनराव चौधरी
शिरपूर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जिव्हाळ्याचा उपक्रम ‘मन की बात’ हा कार्यक्रम उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदार, सर्वच लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी घराघरात व प्रत्येकाने बघावा व ऐकावा यासाठी सर्वांनीच लक्ष घालावे असे आवाहान मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमाचा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजकपदी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल शिरपूर भाजपातर्फे त्यांचा (दि. १३ जानेवारी) रोजी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, भाजयुमो मा. तालुकाध्यक्ष सुनिल माळी, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की चौधरी, शहर उपाध्यक्ष राधेश्याम चौधरी, अनिल बोरसे, पप्पु राजपुत, प्रमोद पाटील, स्वप्निल पाटील आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.