मॅडम तुम्ही जाऊ नका..बदलीने विद्यार्थीना झाले अश्रू अनावर
भडगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे दोन वर्षात विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते दुरावल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परीषद शाळाची तर दैनाच झाली आहे. मात्र गोंडगाव (ता.भडगाव) येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षिकेची पदोन्नतीने बदली झाल्याने विद्यार्थीना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून ‘त्या’ शिक्षकेसह इतर शिक्षकांचा (Teacher) ही अश्रूचा बांध फुटला.
गोंडगाव (ता.भडगाव) येथील जिल्हा परीषद शाळेच्या (Zp School) शिक्षिका संगीता पाटील यांची पदोन्नती झाल्याने उपखेड (ता.चाळीसगाव) येथे बदली झाली. आपल्या शिक्षिकेची बदली झाल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांनी संगीता पाटील यांना गराडा घालत रडायला सुरवात केली. “मॅडम तुम्ही जाऊ नका” अशी विनवणी करत विद्यार्थी रडू लागले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.
..अन् शिक्षिकेच्या अश्रूचा बांध फुटला
शाळेतील विद्यार्थी शिक्षिकाच्या गळ्यात गळा घालून रडायला लागले. त्यामुळे शिक्षिका संगीता पाटील यांना ही अश्रू अनावर झाले. त्या ही विद्यार्थ्यांबरोबर रडू लागले. तर इतर शिक्षकांचाही अश्रूचा बांध फुटला. यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते कीती घट्ट होते. हे या प्रसंगावरून अधोरेखित झाले. तर आज दिवसभर या प्रसंगाचीच चर्चा ऐकायला मिळाली. पालकांचे डोळे पाणावले. संगीता पाटील या विद्यार्थ्यांना समजवून सांगत होत्य. मात्र विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रूची धार थाबत नव्हती.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका
संगीता पाटील या विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्या गोंडगाव जिल्हा परीषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. येथे सेमी माध्यमाचे वर्ग आहेत. पहीले ते चौथीपर्यंतच्या सात तुकड्या आहेत. संगीता पाटील यांच्याकडे दोन तुकड्या होत्या. कारण विद्यार्थी दुसर्या तुकडीत जायला तयार नव्हते. त्यांची शिकवण्याची पध्दत, विद्यार्थ्याशी संभाषण करण्याच्या पध्दतीमुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या आवडत्या शिक्षिका बनल्या होत्या. त्यांचा शिस्तपणा ही वखाण्याजोगा आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील व व्यवस्थापन समतिचे अध्यक्ष मांडोळे यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना सांगीतले.
‘कोरोना’त ज्ञानकुंड तेवत
कोरोनात (Corona) सर्वत्र शाळा बंद होत्या. शाळा आणि विद्यार्थ्याचे नाते संपुष्टात येते की काय? असा प्रश्न उपस्थीत होऊ लागला होता. विशेषत: जिल्हा परीषद शाळांची मोठी दैना झाल्याची पहावयास मिळाले. मात्र गोंडगाव येथील शिक्षकांनी कोरोनात ही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यात दुरावा येऊ न देता शिक्षणाची ज्योत निरंतर तेवत ठेवली. पहील्या लाटेत काहीप्रमाणत व्यत्यय आला.त्यावेळेस ऑनलाईन च्या माध्यमातून शिक्षण दिले. मात्र दुसर्या लाटेत पटांगणात विद्यार्थ्यांची शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम संगीता पाटील व इतर शिक्षकांनी केले. त्यामुळे एकीकडे शाळा बंद असताना कोरोनाचे नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा भरवली. या शाळेत सात शिक्षक आहेत. त्यापैकी सहा महीला शिक्षिका आहेत एकमेव पुरूष शिक्षक आहेत.
संगीता पाटील या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्यात. पण शिस्तप्रिय तेवढ्यात होत्या. मी मुख्याध्यापक असुनही त्याच्यांकडून अनेक शिकायला मिळाल्या. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ प्रेरणादायी आहे.
– प्रतिभा पाटील, मुख्याध्यापिका: जि.प.शाळा गोंडगाव ता.भडगाव जि.जळगाव