चोपडा रोटरी क्लबला मिळाले पाच अवार्ड्स
अध्यक्ष नितीन अहिरराव सचिव ॲड. रुपेश पाटील कोषाध्यक्ष अर्पित अग्रवाल यांच्या कार्याचा सन्मान
चोपडा (विश्वास वाडे) नागपूर येथे झालेल्या अवॉर्ड सेरेमनी मध्ये रोटरी क्लब चोपडा वर्ष २०२०-२१ साठी विविध क्षेत्रांमध्ये कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक डिस्ट्रिक थ्री झिरो थ्री झिरो कडून वर्ष २०२०-२१ चे अध्यक्ष नितीन अहिरराव व त्यांची टीम यांना अवॉर्डस देऊन गौरविण्यात आले.
रोटरी क्लब चोपडा ने वर्ष २०२०-२१ मध्ये अध्यक्ष नितीन अहिर, सचिव रुपेश पाटील, प्रोजेक्ट चेअरमन व्ही.एस.पाटील, कोषाध्यक्ष अर्पित अग्रवाल व त्यांची टीम कडून कोरोना काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण व गरज असताना लोकांसाठी रोटरी मार्फत भरपूर सेवाकार्य केले. ज्यामध्ये ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर बँक, आर्थोपेडिक लायब्ररी स्थापन करणे, लसीकरण जनजागृती, मोफत मास्क वाटप अशा अनेक कार्य स्थानिक प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून केले ज्याची त्या काळी लोकांना नितांत गरज होती. पर्यावरणासाठी रोटरी क्लब वर्षभर कार्य करत असते तसेच फेलोशिप वाढून महत्त्वपूर्ण कार्य केले, शाळेमध्ये कूपनलिका बसून देणे तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, कोरोना काळात ज्या महिलांना वैधव्य प्राप्त झाले अशा गोरगरीब महिलांसाठी चोपडा रोटरी तर्फे आठ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले होते.
या सर्व कार्याची दखल घेत डिस्ट्रिक्ट थ्री जीरो थ्री झीरो चे गव्हर्नर शब्बीर शाकीर व त्यांची ऍडव्हायझरी टीम तसेच सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर, पास्ट गव्हर्नर संग्रामसिंह भोसले, किशोर केडिया, महेश मोकलकर, राजीव शर्मा, इन्कमिंग डिस्ट्रिक गव्हर्नर आशा वेणुगोपाल, खुराणा यांच्या उपस्थित शनिवारी नागपूर येथे झालेल्या हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये दिमाखदार अवॉर्ड सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, रुपेश पाटील, अरुण सपकाळे, पृथ्वीराज राजपूत सहभागी होते.
सदर कार्यक्रमात रोटरी क्लब चोपड्याला खालील अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये “आऊट स्टॅंडिंग प्रोजेक्टस अँड ऍक्टिव्हिटीज फोर आय केअर” “आऊट स्टॅंडिंग आरसीसी सर्विसेस अँड प्रोजेक्टस ऍक्टिव्हिटीज”, “आऊट स्टॅंडिंग प्रोजेक्टस अँड ऍक्टिव्हिटीज फोर फॅमिली वेलफेअर”, “बेस्ट अनयुजवल सर्विस प्रोजेक्ट” क्लबला तर “डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स स्पेशल अवार्ड” हे पुनम गुजराथी यांना मिळाले. क्लबला मिळालेल्या यशा नंतर क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव ॲड. रुपेश पाटील,अर्पित अग्रवाल यांनी आपल्या क्लबचे सर्व सदस्यांचे आभार मानले.