मध्यरेल्वे भुसावळ विभागात धक्कादायक प्रकार – धावत्या एक्सप्रेसचे डबे इंजिनपासून झाले वेगळे.
दैव बलवत्तर म्हणूनच आमच्या जीवाला कोणाताही धोका पोहोचला नाही.
दिनांक-२६ जुलै २०२२ जळगांव-प्रतिनिधि
मध्यरेल्वे भुसावळ विभागात धावत्या एक्सप्रेसचे डबे इंजिनापासुन वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटलीपुत्र पर्यंत जाणारी रेल्वे क्रमांक १२१४१पाटलीपुत्र एक्सप्रेस ही मुंबईकडून भुसावळकडे येत असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले. सुमारे ३ कि.मी डबे सोडून पुढे गेलेले इंजिन तातडीने परत मागे आणण्यात आले,आणि ते पुन्हा वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले.
या घटनेनंतर एक्सप्रेस मधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले. दरम्यान घटनेतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही जिवित हानी झाली नाही. दैव बलवत्तर म्हणूनच आमच्या जीवाला कोणाताही धोका पोहोचला नाही. परंतु जर या घटनेत दुर्दैवी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार असते? असे प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केले जात आहेत.
घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठ अधिकारींनी रेल्वेची पाहणी केली. घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.