१ मे महाराष्ट्र दिनी जि. प. शाळा पडवळकर वस्ती येथे ध्वजारोहण
मोहोळ : १ मे महाराष्ट्र दिनी जि. प. शाळा पडवळकर वस्ती येथे ध्वजारोहण ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय सोलंकर यांच्या हस्ते करण्यात आले. आज पडवळकर वस्ती येथे हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. यावेळी या कार्यक्रमासाठी आवर्जून माजी सैनिक यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत कडून शाळेला टीव्ही संच, गॅस कनेक्शन या भेटवस्तू देण्यात आल्या. याच वेळी शाळेचे नवीन संडास बाथरूम युनिटचे उद्घाटन प्रशांत बचुटे यांच्या हस्ते करण्यात आले. पाङूरंग सोलंकर याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दानशूर व्यक्तिमत्व पांडुरंग सोलंकर यांनी शाळेस एक ङझन खुर्च्या भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. तसेच सेवानिवृत्त शिक्षक हरिदास बंडगर (गुरूजी) यांनी लहान मुलास द्राक्ष वाटपाचा कार्यक्रम केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीतर्फे वृक्षारोपण संपूर्ण शाळा परिसरात करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.पं. सदस्य दत्तात्रेय सोलंकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिदास बंडगर गुरुजी याने भूषवले. कार्यक्रमासाठी भरपुर संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माझी सैनिक मेजर बचुटे माजी सैनिक काळे व जे देश सेवेत कार्यरत असणारे रोकडे मेजर यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी प्रशांत (भाऊ) बचुटे, दिगंबर बचुटे, सुनील शिंदे, काकासाहेब बचुटे, वाघमारे गुरुजी, चव्हाण गुरुजी, अमोल बचुटे, पप्पू रोकडे, राम भुसे, राम सोलंकर बसाटे, सचिन शिंदे याने भरपूर परिश्रम घेतले सर्जेराव पङवळकर यांचा सत्कार समारंभ पार पडला. युवा उद्योजक दादासाहेब बंडगर यांनी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.




