वैजापुर पोलिस ठाणे येथील पीएसआय मनोज पाटील यांनी उचलले धाडडीचे पाऊल.
दिनांक: २१ जुलै २०२२:
प्रतिनिधि-गहनीनाथ वाघ
वैजापुर: दि. २० जुलै रोजी दुु. १२.५५ वा. जरुळ येथुन ग्रामस्थाची भेट घेऊन सोबत बीट जमादार बेग, चालक कुन्हाडे हे भायगाव येथे पेट्रोलींग साठी जात असताना भायगाांव बसस्टैंड येथे १२.१० वा. गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, भायगाव येथील अंबादास अर्जुन मोरे, भायगाव ता. वैजापुर हा त्याचे घरासमोरील ओट्यावर अवैधरित्या विना परवाना जवळ देशी दारु भिंगरी संञा बाळगुन तिची चोरटी विक्री करत होता बातमी मिळतात पीएसआय मनोज पाटील तसेच बेग व कुऱ्हाडे हे घटनास्थळी गेले तेव्हा मोरे हा इसम त्याचे हातात वायरची पिशवी घेवुन उभा होता.
पोलीसांना पाहुन तो इसम त्याचे हातातील पिशवी सोडुन त्याचे घराचे पाठीमाघे पळुन गेला तो पळत असतांना सोबतच्या पंचानी त्यास पाहुन ओळखले व तो गावातील अंबादास अर्जुन मोरेच असल्याचे सांगीतले. त्यानंरत त्या इसमाने सोडुन गेलेल्या वायरच्या पिशवीचा पंचासमोर झडती घेतली असता त्यात ७०/-रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या १८० एम.एल.च्या काचेच्या ३१ सिलबंद बाटल्या होत्या त्यानंतर बीट जमादार बेग यांनी ती बाटल्याने भरलेली वायरची पिशवी घेऊन एकूण २१७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.