आर्वी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
आर्वी : विश्व रत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आर्वी येथील आंबेडकर नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर केक कापून बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला.
पुतळ्यास विधूत रोषणाई करण्यात आली तर संपूर्ण परिसर निळे झेंडे लावून विविध फुलांनी परिसर सजविण्यात आला होता तर संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी धुळे तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पुतळा समिती अध्यक्ष मनोज साळवे, पंचायत समिती माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा परिषद सदस्य किशोर आलोर, पंचायत समिती सदस्य जिभाऊ शेनगे, मोघण गट पंचायत समिती सदस्य दिलीप देसले, सरपंच नागेश देवरे, उपसरपंच विश्वनाथ सोनवणे, विनायक केले, संजय अहिरे, ग्रामविकास अधिकारी सुनील देसले, राजू सोनवणे, नाना शिंदे, बिजू पवार, संजय चौधरी, गोलू बागले, अरुण अहिरे, प्रकाश पाटील, नंदू बागले, योगेश गर्दे, बंडू नानकर, वासू महाराज, खैरनार, बापू कदम, ज्ञानबा कदम, साळवे, शांताराम दुकळे, सोमनाथ पुंडे, सखाराम गर्दे, किशोर देवरे, विठ्ठल पाटील, शेपां राजे, पो कॉ भूषण पाटील, पो कॉ योगेश सोनार, निलेश पाटील, नितीन दिवसे, पवन मंडाले, गणेश बोरसे, चंद्रकांत माळी, योगेश साळवे, महादू साळवे, पत्रकार युवराज हाके, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश खैरनार, योगेश अहिरे, नारायण साळवे, नवल साळवे, रविंद्र योगेश साळवे, नाना साळवे, सतिष पवार, आंबेडकर नगर येथील येथील सर्व युवकांसह महिला गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.