शिरसाळा व हिंगणा गावाचा रस्त्यालगत खोल घरण नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी ; सामाजिक कार्यकर्त्याचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन !
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावी येथे प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ “शिरसाळा मारोती” मंदिरात भाविक भक्त नागरीकसह कुंटुंब देव दर्शनाला येतात. परंतु शिरसाळा व हिंगणा या गावाचा अंतरमध्ये रस्त्यालगत खोल घरण नाला आहे. त्यामुळे नागरीकांच्या संरक्षणासाठी घरण नाला लगत रस्त्याच्या साईटला लोंखडी कठडे किंवा संरक्षण भिंत व इतर पर्याय व रस्त्याला वळण असल्यामुळे दर्शनी बोर्ड लावण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रकाश उगले यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावी येथे प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ ” शिरसाळा मारोती” मंदीर असुन येथे जळगाव, बुलढाणा व इतर जिल्हातील भाविक भक्त नागरीकसह कुंटुंब देव दर्शन व नवस देण्यासाठी शनिवार व इतर दिवस शिरसाळा गावी येथे येत असतात, परंतु शिरसाळा व हिंगणा या गावाचा अंतर मध्ये रस्त्या लगत खोल घरण नाला असुन व रस्ता लहान असल्यामुळे देव दर्शनासाठी येणारे भाविक भक्त वाहन चालवतांना व भाविक भक्त पायी चालतांना तसेच गावातील नागरीक व शाळेत जाणारी मुले अप व डाऊन (येणे व जाणे) वेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी नाला जवळ दुर्देवी घटना व अपघात घडू नये, यासाठी नागरीकांच्या संरक्षणासाठी घरण नाला लगत रस्त्याच्या साईटला लोंखडी कठडे किंवा संरक्षण भिंत व इतर पर्याय व रस्त्याला वळण असल्यामुळे दर्शनी बोर्ड लावण्यात यावे, याबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्याबाबत व योग्य तो निर्णय घेतल्याबाबत अर्जदार यांना माहितीस्तव लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे यात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले, अंकुश बोरसे, विलास पाटील, अमोल रेणुके, शेक शब्बीर, शेक आलम, मण्यार, नामदेव सूर्यवंशी, रामदास तायडे, शिवदास माळी, माणकचंद जैन, संजय तायडे, नरेश डहाके, गोपाळ वखरे, किशोर बडगुजर, रवींद्र तेली, भागवत सपकाळ सर्व मित्र बांधव उपस्थित होते.