महाराष्ट्र

बोदवड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग रामभरोसे

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाला भेट दिली असता त्या ठिकाणी एकही कर्मचारी आढळून आला नाही याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण दीक्षित यांच्याशी फोनवर चर्चा केली असता साहेबांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषय टाळण्याचे प्रयत्न केला. बोदवड तालुक्यात बऱ्याच विविध ठिकाणी संत गाडगे महाराज यांचा जयंतीनिमित्त स्वच्छतेचे संदेश देऊन साजरी करण्यात आली. पण बोदवड शहरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कार्यालय रामभरोसे सोडून कार्यालयात एकही व्यक्ती हजर नसल्याचे दिसत आहे.

या ठिकाणी कार्यालयातील बाहेर असलेला बाहेरील व्यक्ती यांच्याशी चर्चा केली असता मी कर्मचारी नसून मला या गोष्टीचं कोणतीही माहिती नाही मी रोजंदारी म्हणून काम करतो याठिकाणी सकाळपासून आलो आहे पण संत गाडगे महाराज कार्यालयात साजरी न झाल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन असणे नाकसेन सुरळकर सचिन उगले सतीश बावसकर सुरेश कोळी यांनी तहसिलदाराकडे या विषयाचे निवेदन देऊन पुढील काय कारवाई केली जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे