शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे होलिकोत्सव निमित्त होळी प्रज्वलित होण्यापूर्वी वृक्ष पूजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत माता पूजन देखील करण्यात आले.
सन 1990 पासून शहीद शिरिषकुमार मित्रमंडळातर्फे पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या इको फ्रेंडली होळी ची परंपरा यंदाही कायम आहे.
गुरुवारी सायंकाळी बालवीर चौकात शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बालवीर चौक, भोईवाडा परिसरातील महिला सुवासिनी आणि बेटी बचाव अंतर्गत महाविद्यालयीन युवतींचा हस्ते तुळशी, कडूलिंब, आंबा, पेरू यासारख्या वृक्षांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिलांतर्फे हळदीकुंकू उपक्रम घेण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. मंडळाच्या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमाबाबत पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कौतुक केले.
याप्रसंगी एपीआय वाघ, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील,युवराज राठोड उपस्थित होते. सायंकाळी सूर्यास्तानंतर बालाजी वाड्यातील ऐतिहासिक मानाच्या होळीतून गोपाल हिरणवाळे यांनी मशाल प्रज्वलित करून आणली. त्यानंतर बालवीर चौकातील पर्यावरणपूरक होळी प्रज्वलित झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत, आकाश गवळी, प्रा. एकनाथ हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, विशाल हिरणवाळे, आदींनी परिश्रम घेतले.