महाराष्ट्र
गोरेगाव येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा घोषित
वरुड (रुपेश वानखडे) तालुक्यातील गोरेगाव येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा घोषित करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रविण वानखडे, सचिव पुरुषोत्तम पोटोडे, तालुका संघटक उमेश घोंगडे, बेनोडा जिल्हा परिषद सर्कल उपाध्यक्ष सचिन गुडधे यांच्या उपस्थितीत शाखा अध्यक्ष म्हणून संजय पांडे, उपाध्यक्ष प्रफुल राउत, सचिव पंकज वानखडे, सहसचीव प्रविण गोडबोले, सदस्य राहुल गोडबोले, राजेश नागले, अनील शेकापुरे, सुनील दिघडे, राजु चौधरी, निकेश काळबांडे, दादाराव पांडे, अशोक पांडे, संतोष घारड, अनिकेत जाधव, संजय ठाकरे, पांडुरंग गोहत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.