महाराष्ट्र
बुलढाणा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अशासकीय सदस्यपदी सुखदेवराव सुखधाने यांची निवड
पातूर (सुखलाल उपर्वट) सुखदेवराव सुखधाने (माजी सैनिक) यांची बुलढाणा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाल्या बदल त्यांचे स्वागत करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, बुलढाणा जिल्हासह प्रभारी दिलीप भोजराज, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ऍड अनंतराव वानखेडे, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस कैलास सुखधाने, नगराध्यक्ष विलास चनखोरे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस कलीम खान, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव देशमुख, सेवादलाचे राज्य सरचिटणीस शैलेश बावस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.