जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोदवड महाविद्यालयात रासेयो एकेकाद्वारे महाविद्यालय परिसरात बाहेरच्या वर्गखोल्या व निरोगी खुल्या जागा या अनोख्या उपक्रमाचे आयोजन
बोदवड : कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड च्या राष्ट्रीय सेवा एकक व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, उच्च शिक्षण विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक जागतिक पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.
पर्यावरण हा शब्द परि आणि आवरण या दोन शब्दांनी बनलेला आहे ज्यामध्ये परि म्हणजे आपल्या अवतीभवती किंवा आपल्या सभोवताली.आवरण म्हणजे आपल्या सभोवताल जे व्यापले आहे. पर्यावरण हे वातावरण,हवामान,स्वच्छता,प्रदूषण आणि झाडांपासून बनलेले आहे. सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे. प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो.मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे. प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.मानवाच्या वाईट सवयी जसे की पाणी घाण करणे,पाण्याचे अपव्यय करणे,झाडे कापणे,या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्तींना सामोरी जावे लागते.
सदर दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल बारी यांनी ऑउट डोअर क्लासरूम म्हणजेच बाहेरच्या वर्गखोल्या हा उपक्रम राबविला या मध्ये आपण नेहमी प्रमाणे नियमित तासिका वर्गामध्ये घेतो, परंतु ह्या दिवशी प्रा. डॉ. बारी यांनी त्यांच्या तासिका ह्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात घेतल्या त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये सामाजिक संबध, निर्णय घेण्याची समाज यामध्ये सुधारणा झाली. त्या सोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वताचा आत्मविश्वास वाढला सकारात्मक पर्यावरणीय वर्तनाशी संबंधित क्रियाकलापांचे दीर्घकालीन परिणाम झाल्याचे दिसून आले.
त्यासोबतच हेल्त्दी ओपन प्ल्येसेस हा उपक्रम सुद्धा राबविला, महाविद्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी असलेल्या असलेल्या विविध खुल्या जागाचे “निरोगी खुल्या जागा” म्हणून निवड केली मोकळ्या जागेमुळे विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आनंदापासून ते भावनिक आरामापर्यंत विस्तृत श्रेणी निर्माण झाली.ज्यामुळे कॅम्पसमध्ये कल्याण वाढेल व त्यासोबतच छोट्या- छोट्या लँडस्केप असलेली छोटी मोकळी जागा विद्यार्थ्यांसाठी आरोग्यावरील परिणामांसाठी अधिक जवळची असू शकते.
सदर उपक्रमामध्ये संभाजी टिकारे, पूजा जाधव, मोहिनी तुरक, शुभागी राऊत, निवृत्ती चौधरी, मोहन ताठे, हृषिकेश चौधरी, अजय डीवरे, शुभम रोहीमारे, अक्षय नखोद, गौरव सुलताने, नेहा आहुजा निकिता पालवे, समृद्धी सोनटक्के, वैभव भोंबे, अभिजित शिंदे व इतर स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संखेने उपस्थिती होती. या दोन्ही उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणासाठी सक्रिय जबाबदारी घेण्याचा अनुभव मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी या वेळी सांगितले.
सदर उपक्रमचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रासोयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल बारी, प्रा. डॉ. माधव वराडे, प्रा. डॉ. वंदना बडगुजर, प्रा. डॉ. ईश्वर म्हसलेकर यांनी केले. सदर अनोख्या उपक्रमबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे राष्ट्रीय सेवा योजनचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, राष्ट्रीय सेवा योजनचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. मनिष करंजे, संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उप-अध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेच्या, जेष्ठ संचालक अँड. प्रकाशचंद सुराणा संचालक मंडळ तसेच परिसरातील सर्वानी कौतुक केल्याचे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या अनोख्या उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणासाठी सक्रिय जबाबदारी स्वीकारुन पर्यावरण रक्षणासाठी नवयुवक घडविण्यास मदत होईल.
– प्राध्यापक अरविंद चौधरी, प्राचार्य