भारत भ्रमणला निघालेले वैष्णव दाम्पत्याचे धुळ्यात स्वागत
धुळे (करण ठाकरे) भारत भ्रमणसाठी मोटारसायकलने निघालेल्या बकुळेश्वर वैष्णव व त्यांच्या पत्नी कामाक्षीबेन वैष्णव ह्या गुजरात येथील दाम्पत्याचे धुळे येथे स्वागत करण्यात आले.
सदर दाम्पत्य हे भारत भ्रमणासाठी गुजरात राज्यातील जामनगर येथून निघाले असून “वैष्णव संप्रदायाचे व्दारे यांना भेट देणार असून त्यासोबत वैष्णव संप्रदायाची महती सांगणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील चार ज्योतिर्लिंग आणि साडेतीन शक्तीपीठे यांचे ते दर्शन घेणार आहेत. मध्यप्रदेशातील महेश्वर येथे नर्मदेची आराधना करीत ते आपला मार्गक्रमण करीत आहेत. नुकतेच त्यांचे धुळे येथे आगमन झाले होते. यावेळी त्यांचे वैष्णव बैरागी विकास फौंडेशन महाराष्ट्राचे सचिव बंटी बैरागी, संजय बैरागी, प्रदिप बैरागी, हर्षल साळुंके, सिध्दांत बैरागी, भूषण बैरागी, वनिताबाई बैरागी, सुरेखा बैरागी, संदिप पाटील आदिंनी त्यांचे स्वागत केले.