सरपंच परिषद व ग्रामसेवक संघटना यांच्यातर्फे खा. रक्षा खडसेंचा सत्कार
मुक्ताईनगर (सचिन झनके) प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केल्याबद्दल सरपंच परिषद व ग्रामसेवक संघटना यांच्यातर्फे खासदार रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण” (PMAY-Gramin) अंतर्गत सदर योजनेपासून वंचित असलेल्या बेघर परिवारासाठी केंद्र सरकार तसेच ग्रामविकास मंत्रालयातर्फे काही विचार करण्यात येत आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित केल्या बद्दल सरपंच परिषद जळगाव व ग्रामसेवक संघटना जळगाव यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात येऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ, जामनेर तालुका अध्यक्ष भागवत, जिल्हा सचिव श्रीकांत पाटील, आंबिल होळ सरपंच बाळू चव्हाण, सरपंच गणेश पाटील, जिल्हा ग्रामसेवक संघटना प्रतिनिधी सुभाष खिरोडकर, ग्रामसेवक संघटना मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण चौधरी, ग्रामसेवक एकनाथ कोळी, ग्रामसेवक किरण कांबळे, ग्रामसेवक मनोज घोडके, ग्रामसेवक भंडारे, ग्रामविकास अधिकारी मनोहर रोकडे इत्यादी सरपंच परिषद व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.