तरुणांनी व्यसनापासून दूर रहा, आई वडिलांची सेवा करा : ह.भ.प. जान्हवी महाराज सोनवणे
संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
सोयगांव (विवेक महाजन) आई वडिलांची सेवा करा, तरुणांनी व्यसनापासून दूर रहा असे प्रतिपादन ह. भ. प. जान्हवी महाराज सोनवणे यांनी सोयगांव येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनात केले.
सोयगांव येथे तीळवण तेली समाजाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी प्रतिमा पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सोयगांव येथील संतोष सोनवणे यांची कन्या ह. भ. प.कु. जान्हवी सोनवणे (वय १३) ही आळंदी येथे कीर्तन, गायन शिकत आहे. प्रथम कीर्तन सेवा संताजी महाराज पुण्यतिथीला समर्पित केली. व्यसन करू नका, आई वडिलांची सेवा करा. स्त्रीभ्रूण हत्या थांबवा असे आवाहन केले. गायनाचार्य ह. भ. प. प्रेरणा येलगट्टे, अगस्ती महाराज वारकरी संस्थेचे ह. भ. प रवींद्र महाराज परेराव, शरद महाराज, निवृत्ती महाराज, कमलाकर महाराज, महेंद्र पिंगाळकर, दिपक महाराज आदींनी कीर्तनाला सहकार्य केले. राजेंद्र आहिरे, ह. भ. प. सुधनवा महाराज केणेकर, ह. भ. प. माऊली पाटील, अरुण सोहनी, यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. सर्व तेली समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.