मालपुर रोड पाण्याच्या टाकीजवळ सांडपाण्याचा पाईप फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथील मालपूर रोडवरील पाण्याचा टाकीजवळ मागील तीन ते चार महिन्यांपासुन गटारीत जाणारा सांडपाण्याचा पाईप फुटल्याने रहिवासी वस्तीत रोडावर या पाईपचे घाण पाणी येत असल्याने आजूबाजू व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत कर्तव्यदक्ष नगरपालीकेतील संबधीत बांधकाम सभापती,आरोग्य सभापती प्रतिनिधी तसेच वार्डाचे नगरसेवक यांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन जात, नंतर सोशल मिडीया म्हणजे व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम मार्फत वेळोवेळी जनताभिमुख तक्रारीची अनेकदा आठवण करून दिली. मात्र संबंधित नगरसेवक-सभापती यांनी “तेरी बात-मेरी गांड सुनती” सारखा आजवर प्रयत्न करत झोपेचे सोंग घेतले आहे.
एकीकडे देश-राज्य व ग्रामीण भागातील जनता कोरोना सारख्या महामारीतुन सावरत नाही. तोच आता नव्याने ओमायक्रोन नावाच्या दुसरी महामारी भारतात येत आहे. म्हणून सरकार आजपर्यंत जनतेचे आरोग्य-जीवनमान वाचवण्यासाठी सर्वपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे कर्तव्यदक्ष नगरपालीकेतील नगरसेवक-संबधित सभापती यांना वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक घटनेची तक्रार देऊन-वेळोवेळी आठवण देऊन देखील, तीन महिन्यापर्यंत तक्रारीवर कोणत्याही प्रकारे अंकुश लावण्यात येत नसुन नागरिकांना दररोज दुर्गंधी व आरोग्य बाबत तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून अनेकवेळा नागरिकांना लेखी ऐवजी तोंडी तक्रारींची अपेक्षा करणारे नगरसेवक-सभापती ऐवढ्याशा तक्रारीवर का मात करू शकले नाही?, का गटारवरही गटा-तटाचे राजकारण आहे? म्हणजे हा आपला माणूस-कार्यकर्ता आहे. म्हणून लवकर काम करायचे व हा विरोधी गटाचा किंवा येथे विरोधक-फुटीरवादी निवडुन आलेले असल्याने, त्याचा वार्डाच्या समस्यांचा निपटारा करायचा नाही, असा नियम घातला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यावर पडत आहे. म्हणून आता तरी “तेरी बात-मेरी गांड सुनती” व झोपेचे सोंग घेतलेल्या नगरसेवक-सभापतींनी तातडीने मार्ग काढत,तक्रारीचा निपटारा करायला हवा. ऐवढीच अपेक्षा मालपुररोड पाण्याचा टाकी परिसरातील नागरिक करत आहे.