जिजामाता कन्या विद्यालयाने जीवन घडविले माजी विद्यार्थीनींनी दिला आठवणींना उजाळा !
१९७५ पासूनच्या माजी विद्यार्थीनींचा सन्मान
धुळे (करण ठाकरे) आमच्या आयुष्याला खर्या अर्थाने दिशा देण्याचे काम आणि यशस्वी जीवन घडविण्यात महत्वपूर्ण योगदान धुळ्यातील जिजामाता कन्या विद्यालयाचे आहे. आज या विद्यालयातून शिक्षण घेणार्या माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असल्याच्या प्रतिक्रिया येथील जिजामाता कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनींनी व्यक्त करीत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले स्मृतिदिन आणि महिला दिनाचे औचित्य साधुन दि. १० मार्च रोजी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयत १९७५ पासून शिक्षण घेणार्या माजी विद्यार्थीनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कुणाल पाटीलयांच्या सुविद्य पत्नी अश्विनीताई कुणाल पाटील ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलतांना उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे तरच यश मिळते. स्वप्न पाहत असतांना मेहनत करण्याची तयारी ठेवावी, शालेय जीवनात परिश्रम घेतले तर आयुष्याला कलाटणी मिळत असते. आपल्या आयुष्यात स्पर्धा ही कायम असते मात्र स्पर्धा जिंकण्याचे कसब आत्मसात करता आले पाहिजे. आजही अनेक भगीनी विविध क्षेत्रात मागे आहेत त्यामुळे त्यांना प्रगतीच्याशिखरावर घेऊन जाण्यासाठी व महिलांनी मदत करण्याचे त्यांनी शेवटी आवाहन केले. उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी विद्यार्थीनींना स्पर्धा परिक्षांची तयारी व प्रक्रीये विषयी माहिती
दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अश्विनीताई कुणाल पाटील यांनी सत्कारार्थीशी बोलतांना सांगितले कि, सामाजिक व प्रशासकिय सेवेतील महिला ह्या खर्या अर्थाने आपले आदर्श आहेत. पुढील काळात महिलांनी सक्षम व सबल होण्यासाठी आपले ध्येय उराशी बाळगुन पुढे गेले पाहिजे. यावेळी अश्विनीताई पाटील यांनी विद्यार्थीना शुभेच्छाही दिल्या. यावेळी प्राचार्या अपर्णा पाटीलयांनीही मार्गदर्शन केले.
शाळेमुळेच जीवन घडले
यावेळी मनोगत व्यक्त करतांना माजी विद्यार्थ्यांनींनी सांगितले कि, जिजामाता कन्या विद्यालयामुळेच आमचे जीवन घडले आहे. आज या विद्यालयात शिक्षण घेणार्या वि द्या पोलिस, शिक्षण, अभियांत्रिकी तसेच उद्योग व्यवसायात अग्रेसर आहेत. या शाळेमुळेच आमचे जीवन घडले असल्याचे सांगत १९७५ पासून शिक्षणार्या विद्यार्थीनींनी आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला अश्विनी पाटील, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, प्राचार्या अपर्णा पाटील ह्या उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रतिभा सुर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन विशाल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी. टी. पाटील, मनिषा गोसावी.बी.सी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.