वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मोरेंच्या विरोधातील गुन्हा मागे घ्यावा ; आदिवासी एकता परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून धुळे येथील महानगर पालिका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश मोरे यांच्या वर बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणात अडकले आहे. व गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.एक आदिवासी समाजातील अधिकारी यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन संपत्त आदिवासी समाज झाला आहे.त्यात विविध संघटनांनी निवेदन व निदर्शने आंदोलन सुरू केले आहे. त्या पाश्वभुमीवर आज आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी यांनी तहसीलदार सुनील सैदाणे यांना निवेदन सादर करून निदर्शने करण्यात आले.
गेल्या आठवडय़ापासुन धुळे येथील महानगर पालिका येथील बोगस लसीकरण प्रमाणपत्र वाटपात कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे.त्यात मुख्य आरोपी करून आदिवासी समाजातील आरोग्य अधिकारी डाॅ.महेश मोरे यांना अटक केली आहे. या प्रकरणी खरे सुत्रधार घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी. व न्याय मिळवून द्यावा.हयात राजकीय अस्तक असल्या कारणाने सदर गुन्हयातुन वगळण्यात आले आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे गलिच्छ राजकारण पोलीस प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आले आहे. हे कायदा व सुव्यवस्थेसाठी धोक्याचे आहे.आरोग्य अधिकारी हे आदिवासी समाजातील असल्याने जातीयवादयाकडुन संगणमताने अधिकारी ला संपवण्याचा हा सर्व खेळ आहे.
यासाठी आता सर्व आदिवासी संघटना एकवटल्या आहेत.सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्या वरील गुन्हा मागे घेण्यात यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आज आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेद्र देवरे, दिपक फुले, आप्पा सोनवणे, सुरेश मालचे, शानाभाऊ सोनवणे, एकनाथ भिल, शंकर मोरे, अशोक पवार, किशोर ठाकरे या पदाधिकारीसह शेकडो कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून निदर्शने करण्यात आले.