चोपडा एकलव्य संघटनेचे पंचायत समितीचे बीडीओ सोबत बैठक ; उपोसानाचा इशारा
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) चोपडा एकलव्य संघटनेचे पंचायत समितीचे बीडीओ सोबत बैठक करुन उपोसानाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, गाव ग्रामपंचायतमध्ये जे काही आदिवासी भील समाजाचे गरजू लोकांचे नाव डी यादी मध्ये आहेत ते ग्रामपंचायत पातळीवर इतर व्यक्तींचे नावे घेतली जातात ते थांबून गरजु लाभार्थी असतील त्यांनाच लाभ मिळावा असे म्हंटले आहे. असे न झाल्यास येत्या ०६ एप्रिल २०२२ रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषणाचे स्थळ तहसील कार्यालय चोपडा. असे निवेदन पंचायत समितीचे बीडीओ व चोपडा तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिरालाल गायकवाड व तालुका अध्यक्ष सखाराम सोनवणे व सुनिल भील व सर्व आदिवासी भिल समाज बांधव यांनी चोपडा बीडीओ यांचा सोबत बैठक करुन आपल्या समस्या मांडल्या व यावेळी सर्व चोपडा तालुक्यातील एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.