दिनांक- २६ आँगस्ट २०२२
वैजापुर प्रतिनिधि-गहनीनाथ वाघ
श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते या श्रावणात पिठोरी अमावस्याला बैलपोळा साजरा केला जातो पोळा म्हणजे शंकर महादेवाचे वाहन नंदी (बैल) व शेतकऱ्याचेलाडके व जिवलग म्हणजे कौटुंबिक सदस्य म्हणता येईल शेतकरी बैलांना मुलाबाळापेक्षाही जास्त जीव लावतात त्यांचाच हा सण म्हणजे पोळा.
या दिवशी शेतकरी भल्या पहाटे बैलांना आंघोळ घालतात पोटभर खायला देतात व बैलांकडून कुठल्याही प्रकारचे काम या दिवशी केले जात नाही त्यांना पुरणपोळी कारंजा कापण्या अशा वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य केला जातो व गावातील गवळीबाबा हनुमान मंदिर महादेवाचे मंदिर या मंदिरामध्ये बैलांना नवीन फुगे कासरे नाकातील व्यसन मोरखी अशा अनेक प्रकारचे सजावटीचे वस्तू कलर टाकून बैलांना सजविले जाते व या मंदिरांमध्ये दर्शनासाठी नेले जाते अल्पशा हा पाऊस असला तरीही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढसाळलेली आहे पण आपल्या कष्ट करणाऱ्या बैलांसाठी शेतकऱ्यांनी उसनवारी किंवा कर्ज काढून पोळा सण साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे हा सण २६ आँगस्ट रोजी असला तरीही दहेगाव येथील आठवडे बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात सजावटीचे वस्तू दुकाना आल्या होत्या व शेतकऱ्यांनी आठवडे बाजारात मोठी गर्दी ही केली होती.