महाराष्ट्र
फुले, शाहु, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेर तर्फे समाजरत्न २०२२ सन्मान गौरव सोहळा संपन्न
भुसावळ : वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांना फुले, शाहु, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेरतर्फे समाजरत्न २०२२ आत्माराम तायडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते, आंदोलन पुरुष, महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ, संविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष जगनभाई सोनवणे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, वंचित बहुजन आघाडी रावेर तालुकाध्यक्ष बाळु भाऊ शिरतुरे, राजेंद्र अटकाळे, बंटि सोनवणे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, मेजर दिलीप भालेराव सह मान्यवर उपस्थित होते.